Posts

वागणूक !!!

(ट्रिंग ट्रिंग ट्रिंग...ट्रिंग ट्रिंग ट्रिंग...!! निखिलचा अलार्म वाजला. लगेच निखिल उठला आणि त्याने एक झलक घड्याळाकडे टाकली.) निखिल: "ओह शिट! ७.३० वाजले." (लगेच निखिल उठला आणि ब्रश करून अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेला. भरभर आंघोळ उरकून निखिल बाहेर आला. बाहेर आल्या आल्या कपडे घालत घालत बायकोला उद्देशून,) निखिल: "मीरा मला उशीर झालाय. आज मला नाश्ता नको मी जातो लगेच निघून." (ते ऐकून मीरा किचनमधूनच निखिल ला आवाज देत,) मीरा: "अरे असं काय करतोस. नाश्ता तयार आहे. लगेच खाऊन जा ना.  दोन मिनिट देखील लागणार नाहीत." (आधीच उशीर झाल्याने निखिल वैतागलेला होता. त्यामुळे तयार होऊन लगेच तो बाहेर आला आणि मीराला उद्देशून,) निखिल: "हि गोष्ट आहे ना मीरा तू सकाळी लक्षात घ्यायला हवी होतीस. स्वतः मात्र सकाळी मस्तपैकी लवकर उठून आपल्या कामाला लागलीस आणि मला इथे उठवायला तुला जमलं नाही" (निखिलचे ते टोचून बोललेले शब्द कानावर पडताच "आपली काय चूक नसताना उगाच ऐकायला लागतंय " म्हणून मीरा देखील वैतागली. त्यामुळे त्या वैतागलेल्या मूडमध्ये निखिलला उद्देशून,) मीरा: "...

स्क्रोलिंग...!!!

Image
 " काय ! झाला ना सगळा अभ्यास व्यवस्थित ? नीट पेपर लिही रे बाळा . इकडे तिकडे बघत टाईमपास करू नकोस . एकाच प्रश्नावर जास्त वेळ घालवू नकोस . पेन वगरे सगळं घेतलं आहेस ना रे ? सोबत २ पेन एक्सट्रा घेऊन ठेव . परीक्षेला ऐन वेळी पेन संपून इकडे तिकडे मागण्यात टाइम जायला नको . आणि देवाचं नाव घेऊन जा जाताना म्हणजे पेपर नक्कीच चांगला जाईल " आई परीक्षेला जाण्याआधी आदित्यला सुचवत होती . " हो हो ! चल आता आशीर्वाद दे म्हणजे पेपर नक्कीच चांगला जाईल ." असं म्हणत आदित्य आईला नमस्कार करण्यासाठी खाली झुकला . नंतर आईचा आशीर्वाद घेऊन आदित्य परीक्षेला जाण्यास निघाला .   कॉलेजमध्ये प्रवेश केल्यावर नेहमीप्रमाणे आदित्य आणि त्याचे सगळे जण एकत्र जमले . पहिलाच पेपर   ऍडव्हर्टिसिमेंटचा होता . पेपर चालू व्हायला अजून वेळ असल्याने सगळे मित्र मिळून झालेल्या अभ्यासाची पुन्हा एकदा उजळणी करत होते . थोड्या वेळाने पेपर सुरु होण्याची बेल वाजली . लगेच सगळ्या मित्रांनी आपल्या बॅग्स आपल्या ...